Farmer from Bhivgaon Bud drowns in dam : भिवगाव बु शिवारात असलेल्या धरणात ४३ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 1 मे रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात 7 मे रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्जुन कौतीकराव शिंदे (वय ४३, रा. भिवगाव बु., ता. देऊळगाव राजा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : भिवगाव बु शिवारात असलेल्या धरणात ४३ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 1 मे रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात 7 मे रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्जुन कौतीकराव शिंदे (वय ४३, रा. भिवगाव बु., ता. देऊळगाव राजा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कौतीकराव हे १ मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भिवगाव शिवारातील धरण परिसरात गेले होते. त्यावेळी पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ रामकिसन मनोहर शिंदे (वय ५०, व्यवसाय शेती, रा. भिवगाव बु.) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कायम मर्ग क्रमांक १९/२०२६ कलम १९४ बीएनएस अंतर्गत नोंद केली आहे.
या प्रकरणाची नोंद पोलिस मुख्य शिपाई उईके यांनी केली असून, पुढील तपास पोलिस मुख्य शिपाई संजय गोरे हे करीत आहेत. घटनेमुळे भिवगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

