Enthusiastic Praveshotsav : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विदर्भातील शाळा सुरू होताच देऊळगाव राजा येथील देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छांचा वर्षाव
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विदर्भातील शाळा सुरू होताच देऊळगाव राजा येथील देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल सिंगलकर, कोषाध्यक्ष ओमप्रकाश धन्नावत तसेच संचालक अनिल गुप्ता प्रमुख उपस्थित होते. यावेळी गावातील महिला व पुरुष पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रतीकात्मक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वितरण करून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापक कोल्हे सर यांनी शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गाडेकर यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक उमाकांत बंड, राठोड सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.समारोपात कोषाध्यक्ष ओमप्रकाश धन्नावत यांनी शाळेच्या एकूण शैक्षणिक वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आगामी शैक्षणिक वर्षातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे देऊळगाव राजा हायस्कूल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

