Mahabreaking

[breaking_news]

Hazrat Tipu Sultan :बाळापुरात हजरत टीपू सुलतान जयंतीचा उत्साह; प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

Hazrat Tipu Sultan : म्हैसूरचे शूरवीर योद्धे, स्वातंत्र्यलढ्याचे अग्रदूत तसेच पराक्रम, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या हजरत टीपू सुलतान रहमतुल्लाहि अलैहि यांची जयंती बाळापुरात मोठ्या अकीदत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

Hazrat Tipu Sultan

शौर्य, स्वाभिमानाचा जागर! टीपू सुलतान जयंतीनिमित्त DSSB ग्रुपचा पुढाकार

झाकिर अहमद

बाळापूर : म्हैसूरचे शूरवीर योद्धे, स्वातंत्र्यलढ्याचे अग्रदूत तसेच पराक्रम, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या हजरत टीपू सुलतान रहमतुल्लाहि अलैहि यांची जयंती बाळापुरात मोठ्या अकीदत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

DSSB ग्रुप जमेतुल कुरैश बॉईजच्या वतीने हजरत सय्यद शाह शरफोद्दीन अब्दाल रहमतुल्लाहि अलैहि यांच्या आस्तान्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित युवक आणि समाजबांधवांनी हजरत टीपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचे स्मरण करून आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमाला इरफान ठेकेदार, अफजल पहलवान कुरैशी, रिझवान कुरैशी, गुलाम बरकत, आसिफ शाह, मोईन शाह, शहजाद, इरशाद कुरैशी, रियाजोद्दीन, रज्जाक पहलवान कुरैशी, आरिफ अरमानी आणि अहरार शाह यांच्यासह DSSB ग्रुप जमेतुल कुरैश बॉईजचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौर्याच्या इतिहासातून एकता आणि बंधुभावाचा संदेश!

हजरत टीपू सुलतान यांचे शौर्य, स्वाभिमान, संघर्षशील वृत्ती आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा आजच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या गौरवशाली इतिहासाचे जतन करण्याबरोबरच समाजात परस्पर बंधुभाव, सामाजिक एकोपा, एकता आणि धार्मिक सलोखा कायम राखण्याचा संदेशही युवकांनी दिला. अकीदत, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top