Immediate Justice for Victims and Quality Investigation : नागरी हक्क संरक्षण पथक, बुलढाणा यांच्या वतीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ तसेच सुधारित अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण तपास प्रक्रियेसंदर्भात पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे 22 मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ही कार्यशाळा पार पडली.

ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलढाण्यात पोलीस कार्यशाळा संपन्न
बुलढाणा : नागरी हक्क संरक्षण पथक, बुलढाणा यांच्या वतीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ तसेच सुधारित अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण तपास प्रक्रियेसंदर्भात पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे 22 मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ही कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यशाळा अश्वती दोर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अर्चना जाधव यांनी केली. कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती म्हणून अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपस्थित होते. त्यांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण तपास आणि पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणेची जबाबदारी अधोरेखित करत मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप तडवी, महेंद्र शामदे, दीपक मापारी तसेच सानप यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा प्रभावी तपास, पीडितांना तात्काळ मदत, न्यायप्रक्रिया आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.या कार्यशाळेत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वाढे आणि केशव नागरे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी नागरी हक्क संरक्षण पथकाच्या अधिकारी अर्चना जाधव आणि त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.

