Mahabreaking

[breaking_news]

Sharad Pawar School :एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा ; शरद पवार विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

Sharad Pawar School : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथून जवळ असलेल्या शरद पवार विद्यालय, वरुड (ता. व जि. बुलढाणा) येथील विद्यार्थिनींनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा (शैक्षणिक वर्ष २०२५–२६) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Sharad Pawar School

मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथून जवळ असलेल्या शरद पवार विद्यालय, वरुड (ता. व जि. बुलढाणा) येथील विद्यार्थिनींनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा (शैक्षणिक वर्ष २०२५–२६) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी एकूण ३१ विद्यार्थी, तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या मंडळ परीक्षेसाठी या ग्रेड परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार असल्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे.

या परीक्षेत  इयत्ता ८ वी मधून कु. अपेक्षा जाधव, कु. धनश्री भीमसनकर, कु. नम्रता क्षीरसागर, कु. सोनाक्षी सपकाळ, कु. प्रगती जाधव, कु. प्रांजली खराट, कु. रितिका सरसांडे, इयत्ता ९ वी मधून कु. सृष्टी काळे, कु. श्रावणी तायडे, तर इयत्ता १० वी मधून कु. प्रगती भीमसनकर व कु. पायल काळे यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री. तायडे सर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना सांगितले की, “या विद्यार्थिनींनी आपल्या कलेतून सातत्य, मेहनत व सर्जनशीलतेचा संगम साधत गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशामागे कलाशिक्षक श्री. कांडेले सर यांचे मार्गदर्शन, मेहनत व विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे.” यशस्वी विद्यार्थिनींच्या या कामगिरीमुळे पालक, शिक्षक व शाळेचा नावलौकिक वाढला असून परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top