Mahabreaking

[breaking_news]

9-month-old infant was found :जग पाहण्याआधीच केला घात;सार्वजनिक विहिरीत ९ महिन्याच्या अर्भकाचा मृतदेह आढळला 

9-month-old infant was found : तालुक्यातील एका गावात सार्वजनिक विहिरीत अंदाजे ९ महिन्यांच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीच्या पाण्यावर अर्भकाचा मृतदेह तरंगताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.

9-month-old infant

अकोला : तालुक्यातील एका गावात सार्वजनिक विहिरीत अंदाजे ९ महिन्यांच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीच्या पाण्यावर अर्भकाचा मृतदेह तरंगताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.

सदर घटना पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माझोड गावातील आहे. गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा वापर ग्रामस्थ दैनंदिन गरजांसाठी करतात. बुधवारी सकाळी काही ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेले असता, विहिरीच्या पात्रात मानवी नवजात अर्भकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. हे दृश्य पाहून ग्रामस्थ हादरले असून काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना अनैतिक संबंधातून लपवण्यासाठी केलेला प्रकार आहे की थेट हत्या, या दृष्टीकोनातून पोलीस तपास सुरू आहे. अज्ञात मातेच्या या कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top