Mahabreaking

[breaking_news]

Electricity distribution company :साखरखेर्ड्यात वीज वितरण कंपनीची धडक कारवाई; ५५ ग्राहकांना दणका

Electricity distribution company : येथील वीज वितरण उपकार्यालयांतर्गत थकीत वीज वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. एकूण १ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करत आज ५५ ग्राहकांची वीज तोडण्यात आली असून २ लाख ५० हजार रुपयांची वसूली करण्यात आली आहे.

Electricity distribution company
१ कोटी ९१ लाखांची थकबाकी; वसुलीसाठी मोहीम, २.५ लाखांची वसूली

साखरखेर्डा :  येथील वीज वितरण उपकार्यालयांतर्गत थकीत वीज वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. एकूण १ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करत आज ५५ ग्राहकांची वीज तोडण्यात आली असून २ लाख ५० हजार रुपयांची वसूली करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांनी थकीत बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील व विलास सवडदकर यांच्या नेतृत्वाखाली १८ फेब्रुवारी रोजी गावातील थकीत ग्राहकांवरील वीज तोडणी मोहीम सुरू करण्यात आली. यासोबतच अवैध वीज जोडण्या शोधून त्यांची वीज तोडण्यात आली तसेच वायर जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आजच्या कारवाईत ५५ ग्राहकांची वीज तोडण्यात आली व २ लाख ५० हजार रुपयांची वसूली करण्यात आली. थकीत ग्राहकांनी तातडीने वीज बिल भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले. ही वसुली मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
आजच्या मोहिमेत प्रशांत रिंढे, प्रशांत हिवाळे, विष्णू भोसले, रवी शेजूळ, शिवाजी जाधव, अरुण जैवळ यांच्यासह सुमारे २५ कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेमुळे दिवसभर गावातील वीजपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top