Eid-ul-Adha prayers : ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त बाळापूर येथील कागदीपुरा परिसरातील मस्जिद बलदार हाफिज येथे ईदच्या नमाजासह धार्मिक कार्यक्रमांची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मस्जिद व्यवस्थापन आणि समितीतर्फे परिसरातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत नमाजासाठी निर्धारित वेळेपूर्वी मस्जिदीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फजरनंतर ईमान जागविणारे मार्गदर्शन; ईद-उल-अजहानिमित्त मुस्लिम बांधवांना आवाहन
जाकीर अहमद
बाळापूर : ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त बाळापूर येथील कागदीपुरा परिसरातील मस्जिद बलदार हाफिज येथे ईदच्या नमाजासह धार्मिक कार्यक्रमांची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मस्जिद व्यवस्थापन आणि समितीतर्फे परिसरातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत नमाजासाठी निर्धारित वेळेपूर्वी मस्जिदीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नेमके ६:०५ वाजता ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी फजरच्या नमाजेनंतर तात्काळ ईमान जागविणारे आणि धार्मिक जाणीव वृद्धिंगत करणारे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शनात ईद-उल-अजहाचे धार्मिक महत्त्व, हजरत इब्राहिम (अलैहिस्सलाम) आणि हजरत इस्माईल (अलैहिस्सलाम) यांच्या त्यागमय कुरबानीचा आदर्श, संयम, तक्वा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या आध्यात्मिक कार्यक्रमात मौलाना मोहम्मद इस्माईल अशाअती हे खतीब व इमाम म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. मस्जिद व्यवस्थापनाने सर्व नमाजींना स्वच्छता, शिस्त, इस्लामी आचारसंहितेचे पालन आणि वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, ईद-उल-अजहा हा केवळ आनंदाचा सण नसून त्याग, सब्र, प्रामाणिकपणा, सामाजिक सलोखा आणि परस्पर प्रेमाचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. समाजात ऐक्य, बंधुभाव आणि मानवसेवेची भावना दृढ करण्यासाठी या सणाचे विशेष महत्त्व असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

