Mahabreaking

[breaking_news]

dr. rajendra Shingne: डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेवर बिनविरोध; सिंदखेडराजा मतदारसंघातील लढत टळली

dr. rajendra Shingne: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ – सिंदखेडराजा येथून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख (रा. राहेरी) यांनी अर्ज मागे घेतल्याने डॉ. शिंगणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

Dr. Rajendra Shingne

अर्ज माघारीनंतर डॉ. शिंगणे यांचा बिनविरोध विजय; जिल्हा बँक निवडणुकीत नवे राजकीय समीकरण

गजानन तिडके 

बुलढाणा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ – सिंदखेडराजा येथून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख (रा. राहेरी) यांनी अर्ज मागे घेतल्याने डॉ. शिंगणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

या मतदारसंघातून सुरुवातीला डॉ. राजेंद्र शिंगणे आणि दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

डॉ. शिंगणे हे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध सहकारी संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या जडणघडणीत त्यांच्या अनुभवाचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, तर काही मतदारसंघांमध्ये थेट निवडणुकीची लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांबाबत राजकीय व सहकार क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे.

सहकार क्षेत्रातील ही निवडणूक केवळ बँकेच्या संचालक मंडळापुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक राजकीय घडामोडींवरही तिचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top