Mahabreaking

[breaking_news]

Do Not Spit Here :‘येथे थुंकू नका’ फलकाकडे दुर्लक्ष; नगर परिषद कार्यालय परिसरातच अस्वच्छतेचा प्रकार

Do Not Spit Here : स्वच्छता आणि नागरी शिस्तीचा संदेश देण्यासाठी बाळापूर नगर परिषद कार्यालय परिसरात “येथे थुंकू नका, थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल” असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करत काही व्यक्तींनी कार्यालय परिसरातच थुंकून अस्वच्छता निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Do Not Spit Here

५०० रुपयांच्या दंडाची चेतावणी ठरली निष्प्रभ; बाळापूर पालिका परिसरात थुंकण्याचे प्रकार सुरूच

झाकीर अहमद शेख

बाळापूर : स्वच्छता आणि नागरी शिस्तीचा संदेश देण्यासाठी बाळापूर नगर परिषद कार्यालय परिसरात “येथे थुंकू नका, थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल” असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करत काही व्यक्तींनी कार्यालय परिसरातच थुंकून अस्वच्छता निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध कामांसाठी नगर परिषद कार्यालयात आलेल्या काही अभ्यागतांनी परिसरातील एका कोपऱ्यात थुंकून स्वच्छतेच्या नियमांना हरताळ फासला. ज्या ठिकाणी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे, त्याच ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, स्वच्छ शहराची संकल्पना केवळ सूचना फलक लावून पूर्ण होणार नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे अस्वच्छता वाढतेच, शिवाय विविध संसर्गजन्य आजारांचा धोकाही निर्माण होतो.

नगर परिषद प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकाचा आदर राखत नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहकार्य करावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top