Mahabreaking

[breaking_news]

Dnyaneshwar Chankhore promoted :ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती; लोणार पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती

Dnyaneshwar Chankhore promoted : साखरखेर्डा ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती होऊन त्यांची लोणार पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना ही बढती मिळाल्याचे मानले जात आहे.

Dnyaneshwar Chankhore promoted

साखरखेर्डा  : साखरखेर्डा ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती होऊन त्यांची लोणार पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना ही बढती मिळाल्याचे मानले जात आहे.

 

साखरखेर्डा ही सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत असून येथे १७ सदस्यांचे ग्रामपंचायत मंडळ कार्यरत आहे. यामध्ये ९ महिला सदस्यांचा समावेश आहे. गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठीही स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर चनखोरे यांनी गेल्या दोन वर्षांत विविध विकासकामे राबवित ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला होता.

कामकाजादरम्यान त्यांना चांगले-वाईट अनुभव आले असले तरी त्यांनी संयम आणि सामंजस्याची भूमिका घेत गावाच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविले. या यादीत ज्ञानेश्वर चनखोरे यांचे नाव अग्रक्रमावर होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांची लोणार पंचायत समितीच्या विस्तार अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा कार्यभार आता मनोज मोरे यांनी स्वीकारला आहे. त्यांनी आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. यापूर्वी मनोज मोरे हे सुमारे १५ वर्षे साखरखेर्डा येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना गावाच्या कारभाराचा चांगला अनुभव असल्याचे सांगितले जाते.

मनोज मोरे यांची यापूर्वी गोरेगाव येथे नियुक्ती होती. मात्र काही नागरिकांनी त्यांच्या कामकाजावर अनियमिततेचे आरोप केल्याने त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन कार्यमुक्ती घेतली होती. त्यानंतर साखरखेर्डा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात आली होती. अखेरीस पंचायत समितीकडे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने मनोज मोरे यांच्याकडे साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top