Mahabreaking

🔴 BREAKING
18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर

Dispute over a farm boundary : शेताच्या धुऱ्यावरून वाद; मंडपगावात महिलेच्या मुलासह महिलेला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Dispute over a farm boundary : तालुक्यातील मंडपगाव येथे शेताच्या धुऱ्यावर असलेल्या लोखंडी खुणीवरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dispute

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : तालुक्यातील मंडपगाव येथे शेताच्या धुऱ्यावर असलेल्या लोखंडी खुणीवरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा संजय कदम (वय ४०, व्यवसाय शेती/घरकाम, रा. मंडपगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व तिचा मुलगा शेतात असताना आरोपी गोपाल दत्तात्रय देशमुख (रा. मंडपगाव) याने शेताच्या धुऱ्यावरची लोखंडी खुण कशी वाकडी झाली, असा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी काहीही न बोलता आपल्या घराकडे जात असताना गावातील शाळेजवळील चौकामध्ये आरोपी गोपाल देशमुख याने फिर्यादीच्या मुलास काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुलाला सोडविण्यासाठी फिर्यादी पुढे गेली असता आरोपी बळीराम दिलीप देशमुख, सचिन गजानन देशमुख व राम शंकर देशमुख यांनी फिर्यादीच्या मुलाचे शर्टचे कॉलर पकडून त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याच्या दोन्ही हातांवर मारहाण केली. फिर्यादीने हस्तक्षेप करत मुलाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादीसही पाठीवर व मानेखाली बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२६ वाजता गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी व उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी भेट दिली असून, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.
दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top