Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Dhaba students :धाबा येथील विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय स्काऊट-गाईड चाचणीत घवघवीत यश

Dhaba students : तालुक्यातील धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्काऊट-गाईड चाचणी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत शाळेचा व तालुक्याचा मान उंचावला आहे. ही परीक्षा भारत स्काऊट्स अँड गाईड्स, जिल्हा कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

Dhaba students

बबन इंगळे 

बार्शीटाकळी : तालुक्यातील धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्काऊट-गाईड चाचणी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत शाळेचा व तालुक्याचा मान उंचावला आहे. ही परीक्षा भारत स्काऊट्स अँड गाईड्स, जिल्हा कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेत लेखी, प्रात्यक्षिक तसेच शारीरिक चाचण्यांचा समावेश होता. या परीक्षेसाठी विद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. पाचही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कौशल्य, नेतृत्वगुण व शिस्तबद्धतेचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थिनींमध्ये पायल महादेव ठाकरे, दिपाली श्रीहरी भेंडेकर, रेणुका अवधूत नागरे, शिवानी दिलीप घुगे व वैभवी राहुल राठोड यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय स्काऊट-गाईड चाचणीत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक अनिल धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक नितीन मानके, स्काऊट-गाईड शिक्षिका जया बोचरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

जिल्ह्यातील इतर बातम्यासाठी अकोला पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top