Mahabreaking

[breaking_news]

Vaishali Dongarjal :देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ होणार सन्मानीत

Vaishali Dongarjal : महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचाही समावेश आहे.

Vaishali Dongarjal

क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीची दखल; १५ ऑगस्टला बुलढाण्यात सन्मान

गजानन तिडके

देऊळगाव राजा : महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचाही समावेश आहे.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी १ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून सन्मानित करण्याची परंपरा आहे. याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध महसूल कार्यालयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

 

विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

जिल्हास्तरीय समितीने केलेल्या निवडीनुसार शरद पाटील, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच देऊळगाव राजा तहसील कार्यालयाच्या तहसीलदार श्रीमती वैशाली डोंगरजाळ, सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार तुकाराम वराडे यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

याशिवाय खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी नंदकिशोर चौधरी, चिखली तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी संजय सुपडू चौधरी, मेहकर तहसील कार्यालयातील महसूल सहायक विनोद मधुकर तोडे, शेगाव तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शंकर चौधरी, मलकापूर तहसील कार्यालयातील शिपाई सचिन ए. गिरी, सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहनचालक कैलास देविदास चव्हाण, चिखली तहसील कार्यालयातील पोलीस पाटील नारायण सुखदेव हिवाळे आणि संग्रामपूर तहसील कार्यालयातील महसूल सेवक पी. डी. वाघ यांचीही सन्मानासाठी निवड झाली आहे.

 

१५ ऑगस्टला होणार गौरव

महसूल विभागाच्या क्षेत्रीय कामकाजात या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शासन निर्णय दिनांक ३१ जुलै २०२६ तसेच संबंधित वरिष्ठ कार्यालयांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.निवड झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे उपस्थित राहावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.महसूल प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात नागरिकांशी थेट संपर्क असलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव होत असल्याने या सन्मानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top