Mahabreaking

[breaking_news]

dry drought :अकोला जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा; बाळापुरात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन!

dry drought : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पिके डोळ्यांदेखत वाळत असून, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) बाळापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

dry drought

  पिके करपली, बळीराजा संकटात; हेक्टरी ५० हजारांची मदत अन् पीकविम्यासाठी काँग्रेसचा एल्गार

बाळापूर : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पिके डोळ्यांदेखत वाळत असून, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) बाळापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाळापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने आणि एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालय गाठून उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

तालुका काँग्रेस अध्यक्ष सत्यनारायण घाटोळे आणि शहर काँग्रेस अध्यक्ष अकरम शेख ईमाम यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मो. जमीर उर्फ जम्मू सेठ, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. मो. फैयाज, रमेश जाफरबादी, नगरसेवक अबू तलहा अन्सारी, मो. सऊद, माजी नगरसेवक मुशीर उल हक, जयराम सोनोने, दीपक पोहरे, दिलीप पाटील, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक बोरसे, माजी नगरसेवक रईस अहमद कुरैशी आणि मनोहरआप्पा कारंजकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले.

‘शेतकरी वाचला तरच देश वाचेल’

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. पावसाअभावी खरीप पिकांवर गंभीर संकट आले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढणे कठीण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

‘शेतकरी वाचला तरच देश वाचेल’, असा संदेश देत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेक्टरी ५० हजारांची मदत आणि पीकविम्याची मागणी

आंदोलकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे :

शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी.

पीकविमा धारक शेतकऱ्यांना नियमानुसार विम्याची रक्कम तातडीने मंजूर करून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.

ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा आणि रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत.

दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून आवश्यक पंचनामे करण्यात यावेत.

पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आली.

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन बाळापूरपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण अकोला जिल्ह्यात अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन आणि प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top