Mahabreaking

[breaking_news]

pregnant woman: नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू?; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

pregnant woman: तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मुलगी आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडील सदाशिव शंकर देशमुख यांनी तक्रारीत केला आहे.

pregnant

 स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर मृत्यूप्रकरणी पित्याची तक्रार; पाचोड पोलिसांत FIR दाखल

अशोक इंगळे

सिंदखेड राजा : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मुलगी आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडील सदाशिव शंकर देशमुख यांनी तक्रारीत केला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील विशाल अनिल निंबाळकर याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचा काळ सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच माहेरून दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

गर्भधारणेदरम्यान स्वातीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. ६ सप्टेंबर २०२६ रोजी तिला सृष्टी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता, गर्भातील पाण्याचे प्रमाण कमी असून बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. यावेळी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून सिझेरियन करण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मात्र, डॉक्टरांच्या सूचनेनंतरही स्वातीला रुग्णालयात दाखल न करता घरी आणण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा मृत्यू झाला. तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २९ सप्टेंबर २०२६ रोजी पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. FIRमध्ये २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१० वाजता घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पाचोड पोलिस ठाण्यात FIR क्रमांक ०४०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ८५, १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर तसेच अश्वर्या नावाच्या एका महिलेवर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पाचोड पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, उपचाराची आवश्यकता, उपचार मिळण्यात विलंब झाला का तसेच तक्रारीतील आरोपांची वस्तुस्थिती काय आहे, याबाबत वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत. FIRमधील आरोप अद्याप तपासाधीन असून, त्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top