Locks broken : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सस्ती येथे राजेश जगदेव अंभोरे यांच्या घरी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे २२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सस्तीतील चोरीने खळबळ; लाखोंचा ऐवज गायब, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
राहुल सोनोने
दिग्रस बू. : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सस्ती येथे राजेश जगदेव अंभोरे यांच्या घरी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे २२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश अंभोरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केल्यानंतर कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज देवर्जन, शिंदे मेजर, बीट जमादार रवी घुगे, शिवा समी, राहुल महाजन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, ठसे तपासणी पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.
राजेश अंभोरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, एक ५१ ग्रॅम वजनाची बांगडी, एक ३० ग्रॅम वजनाची बांगडी, ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, एक ग्रॅम वजनाचे कानातील दागिने आणि तीन ग्रॅम वजनाची अंगठी असा ऐवज चोरीला गेला आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे २२ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या धाडसी चोरीमुळे परिसरातील घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याचे आव्हान चान्नी पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

