Mahabreaking

[breaking_news]

Country-made Pistol Seized :अकोल्यात युवकाकडून गावठी कट्टा जप्त; सिव्हील लाईन पोलिसांची धडक कारवाई

Country-made Pistol Seized :सिव्हील लाईन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका युवकाकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई १२ मे रोजी रात्री आकाशवाणी केंद्राजवळील रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत निवृत्ती गिरी (वय २१, रा. चांदूर, ता. जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Country-made Pistol Seized

दहशत माजविण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याचा संशय; युवकाला न्यायालयीन कोठडी

यश गवई 

अकोला : सिव्हील लाईन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका युवकाकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई १२ मे रोजी रात्री आकाशवाणी केंद्राजवळील रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत निवृत्ती गिरी (वय २१, रा. चांदूर, ता. जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१० वाजताच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत सिव्हील लाईन पोलिसांना माहिती मिळाली की, एक इसम आकाशवाणी केंद्राजवळील रस्त्याने कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना बोलावून शासकीय वाहनातून घटनास्थळी धाव घेतली.आकाशवाणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित युवक पायी जाताना दिसताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपीच्या कमरेला पॅन्टच्या उजव्या बाजूस एक देशी बनावटीचा लोखंडी कट्टा आणि मॅगझीन आढळून आले. मॅगझीन तपासली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २५ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर अग्निशस्त्र कोणाकडून आणले किंवा कशासाठी जवळ बाळगले याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित युवकाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईत पोउपनि दिनेश पवार, पोहेकाे विजय लाखे, विजय भटकर, शक्ती कांबळे, प्रदीप पवार, प्रशांत शिरसाठ व महिला पोलीस कर्मचारी पूजा साबळे यांनी सहभाग घेतला.दरम्यान, आरोपी वेदांत गिरी यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याचा एमसीआर मंजूर करून त्याला जिल्हा कारागृहात रवाना केले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top