Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Mahashivratri :पातुरातील काशी कवळेश्वर महादेव मंदिरात शिवनामाचा अखंड गजर; महाशिवरात्रीला हजारो भाविकांची मांदियाळी

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त येथील अतिप्राचीन श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिरात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी कवळेश्वर भजन मंडळ तसेच समस्त शिवभक्त मंडळ यांच्या वतीने हा महोत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला.

Mahashivratri

पातुर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त येथील अतिप्राचीन श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिरात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी कवळेश्वर भजन मंडळ तसेच समस्त शिवभक्त मंडळ यांच्या वतीने हा महोत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला.

प्रातःकाळी रुद्राभिषेक व महाआरतीनंतर सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महाशिवरात्रीनिमित्त भक्तांना उपवासाचे लाडू, चहा आणि साबुदाण्याच्या उसळीचा प्रसाद देण्यात आला. यावर्षी तब्बल सात क्विंटल उसळीचे वितरण करण्यात आले.

सकाळपासूनच मंदिर परिसरात शिवनामाचा अखंड गजर सुरू होता. शिवभजने आणि खंजिरीच्या खणखणाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी भक्तिगीतांचा लाभ घेतला. पातुर शहराच्या दक्षिणेकडील चिंचखेड शिवारातील दुर्गम व शांत परिसरात वसलेले हे प्राचीन मंदिर अनेक वर्षांपासून भक्तीपरंपरेचे केंद्र राहिले आहे.

दर सोमवारी हरिनाम स्मरण व पंचपदी आरतीची परंपरा गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून अखंड सुरू असून विविध सेवाभावी व्यक्तींनी ही परंपरा जपली आहे. पुढील पिढीनेही ही भक्तीपरंपरा कायम ठेवावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे भक्त मंदिरापर्यंत पोहोचले. लोकवर्गणीतून नव्हे तर भक्तांकडून साहित्य स्वरूपात देणगी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री काशी कवळेश्वर भजन मंडळ व समस्त शिवभक्त मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

पातूर तालुक्यातील इतर बातम्या : अखेर सावरगावचे सचिव समाधान साळोकार निलंबित; सावरगावसह खेट्री ग्रामपंचायतीचा प्रभार काढला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top