Mahabreaking

[breaking_news]

100 crore defamation notice issued:संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यातील संघर्ष न्यायालयाच्या उंबरठ्यावर; १०० कोटींची मानहानी नोटीस

100 crore defamation notice issued:महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे  सेना आणि भाजप यांच्यातीन मतभेद आता न्यायालयील लढाई पर्यंत पोहचले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे. विजयराज शिंदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत आमदार गायकवाड यांना १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मानहानीची नोटीस बजावली असून, बुलढाणा पोलिस अधीक्षकांनाही स्वतंत्र नोटीस देत गायकवाड यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा, अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

100 crore defamation notice issued.

विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत गायकवाड यांना पाठविली नोटीस ; पोक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल करण्याची मागणी

बुलढाणा : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे  सेना आणि भाजप यांच्यातीन मतभेद आता न्यायालयील लढाई पर्यंत पोहचले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे. विजयराज शिंदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत आमदार गायकवाड यांना १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मानहानीची नोटीस बजावली असून, बुलढाणा पोलिस अधीक्षकांनाही स्वतंत्र नोटीस देत गायकवाड यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा, अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Add para medical college

३ जून रोजी पाठविण्यात आलेल्या नोटिशीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे यांच्यावर आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषणासह इतर गंभीर आरोप केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे आरोप खोटे, असत्यापित आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा शिंदे यांनी नोटिशीत केला आहे.

नोटिशीत असेही नमूद करण्यात आले आहे की, गायकवाड यांच्याकडे अशा स्वरूपाच्या कथित गुन्ह्यांची माहिती असल्यास पोक्सो कायद्यानुसार ती संबंधित यंत्रणांना कळविणे बंधनकारक होते. मात्र, संबंधित यंत्रणांकडे तक्रार न करता केवळ माध्यमांसमोर आरोप करण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या नोटिशीत करण्यात आली आहे.

मानहानीच्या नोटिशीद्वारे गायकवाड यांनी १५ दिवसांच्या आत बिनशर्त जाहीर माफी मागावी, १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने टाळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा फौजदारी मानहानी तसेच दिवाणी दाव्यासह पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड  आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या गाजत असलेल्या राजकीय संघर्षात पुढे कोणते नवे वळण येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top