Mahabreaking

[breaking_news]

Sakharkherda :साखरखेर्डा येथे काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Sakharkherda :गावाचा कारभारी कोणताही असला तरी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य केले, तर गावाच्या विकासाला वेळ लागत नाही. आज जी काही विकासकामे मंजूर झाली आहेत, त्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले आहेच; मात्र त्याहूनही ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वांनी पुढाकार घेतल्यासच गावाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले.

Sakharkherda
गावाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव

साखरखेर्डा : गावाचा कारभारी कोणताही असला तरी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य केले, तर गावाच्या विकासाला वेळ लागत नाही. आज जी काही विकासकामे मंजूर झाली आहेत, त्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले आहेच; मात्र त्याहूनही ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वांनी पुढाकार घेतल्यासच गावाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले.

‘शिक्षण, आत्मविश्वास आणि सुरक्षितता महत्त्वाची’ – डीवायएसपी मनिषा कदम

साखरखेर्डा येथील दगडी मशीद परिसरातील काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते मंगळवार, १० मार्च रोजी करण्यात आला. यावेळी श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे दिवाणजी व चिखली अर्बन बँकेचे संचालक विश्वनाथ आप्पा जितकर, ठाणेदार गजानन करेवाड, गजानन इंगळे, ललित अग्रवाल, संग्रामसिंह राजपूत, अमित जाधव, संतोष अग्रवाल, इब्राहिम शहा, शेख शफी नाईकवाडी, देवानंद खंडागळे, शुभम राजपूत, गणपत अवचार, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, रमेश सराफ, शालिग्राम गवई, माजी सरपंच कमलाकर गवई, गोपाल मानतकर, बाबू नाईकवाडी, संतोष मंडळकर, सोमेश इंगळे, शिवाजी शर्मा, आदित्य तिवारी, रवी राजपूत, विजय काटे, रोहित परहाड यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

साखरखेर्डा येथील श्री शिवाजी व्यायामशाळा परिसरात अनेक दिवसांपासून काँक्रिट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. श्री गणपती विसर्जन मिरवणूक, जगदंबा माता मिरवणूक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचा प्रारंभ याच ठिकाणाहून होत असल्याने या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, रस्त्यावर मोठे दगड उघडे पडल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन या परिसरातील रस्त्यावर काँक्रिट टाकून तो मजबूत करण्यासाठी रामभाऊ जाधव यांनी पुढाकार घेतला. तसेच साखरखेर्डा येथील शिक्षण कॉलनीतील काँक्रिट रस्त्याचे कामही पूर्ण करण्यात आले असून नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे गावातील अनेक रस्ते आता सुस्थितीत येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top