Mahabreaking

[breaking_news]

  Jagadguru Palasiddha Mahaswami :श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी स्मृतीमहोत्सवाला प्रारंभ; २५ दिंड्यांचा भव्य पालखी सोहळा

Jagadguru Palasiddha Mahaswami :तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांच्या ९६८ व्या स्मृतीमहोत्सवास सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. स्मृतीमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध भागांतून आलेल्या तब्बल २५ दिंड्यांनी सहभाग नोंदविला.

Jagadguru

 रांगोळ्यांच्या पायघड्या, पालखीचे पूजन अन् भक्तांचा उत्साह; साखरखेर्ड्यात रंगला भव्य सोहळा

साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांच्या ९६८ व्या स्मृतीमहोत्सवास सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. स्मृतीमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध भागांतून आलेल्या तब्बल २५ दिंड्यांनी सहभाग नोंदविला.

Jagadguru

सकाळी ६ वाजता नामस्मरणाने स्मृतीमहोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी पार पडला. दुपारी २ वाजता विविध ठिकाणांहून आलेल्या दिंड्यांचे मठाधिपती शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

दुपारी ३ वाजता साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. ‘मार्गे हळूहळू चला, मुखाने श्री पलसिद्ध बोला’ या नामघोषाच्या जयघोषात भाविक पावली खेळत मिरवणुकीत सहभागी झाले. श्री पलसिद्ध महास्वामी मठातून सुरू झालेली ही मिरवणूक श्री संत संताजी जगनाडे महाराज चौक, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर, हिंदू सूर्य महाराणा प्रताप नगर, संत रविदास महाराज चौक व बसस्थानक परिसरातून मार्गक्रमण करीत सायंकाळी पुन्हा मठात दाखल झाली.

मिरवणूक मार्गावर गावातील माता-भगिनींनी सडा-सारवण करून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. अनेक ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण साखरखेर्डा नगरीत उत्साहाचे व धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणुकीत श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज अश्वारूढ झाले होते. तसेच आप्पास्वामी पालखी दिंडी, रिसोड; लक्ष्मणस्वामी दिंडी, आष्टी यांच्यासह परळी वैजनाथ, लोहगड, नांद्रा, पानकन्हेरगाव, काटा, परभणी, साडेगाव, जालना, गुंधा, घाटबोरी, डोणगाव, लोनगाव, वेणी व चारठाणा येथील दिंड्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कीर्तनकार नागेश स्वामी, नंदकिशोर स्वामी व विश्वनाथ स्वामी हेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, आशिष बेंदाडे, विश्वनाथ अप्पा जितकर, रमेश बेंदाडे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सेवा समर्पित केली. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार युवराज रबडे व पोहेकॉ रामदास वैराळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top