Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Celebration of women entrepreneurship :महिला उद्योजकतेचा जल्लोष; राजमाता महोत्सवाचा दिमाखात समारोप

Celebration of women entrepreneurship : महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे आणि ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता महोत्सव 2026चा उत्साहात समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

Celebration of women entrepreneurship

राजमाता महोत्सवाला बुलढाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला उद्योजकांच्या उत्पादनांची ४० लाखांहून अधिक विक्री

बुलढाणा : महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे आणि ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता महोत्सव 2026चा उत्साहात समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणा आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव ५ ते ९ मार्च दरम्यान जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले होते.

समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव उपस्थित होते.

महोत्सवाच्या पाच दिवसांत महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना तसेच फूड स्टॉलवरील पदार्थांना मोठी मागणी दिसून आली. मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाचे आकर्षण अधिक वाढले. विक्री अहवालानुसार, या पाच दिवसांत महिला बचतगटांच्या उत्पादनांसह फूड स्टॉलमधून सुमारे ४० लाख १२ हजार रुपयांची विक्री झाली.

महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महिला उत्पादनांच्या गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन केले. प्रत्येक उत्पादनात वेगळेपण असणे आवश्यक असून डिजिटल क्रांतीच्या युगात महिला बचतगटांनी आपल्या उत्पादनांना ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेत बीजोत्पादनाच्या संधींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कृषि विभागाच्या स्टॉलचे कौतुक करत बुलढाणा जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Celebration of women entrepreneurship

समारोपप्रसंगी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून निवडलेल्या १० उत्कृष्ट महिला उत्पादन गटांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यापैकी तीन गटांना विशेष क्रमांक देण्यात आले.

प्रथम क्रमांक: रजनी उमेश वेरूळकर, सातपुडा उत्पादक समूह, सोनाळा (संग्रामपूर) – पेटीकोट उत्पादन; पारितोषिक १० हजार रुपये.

द्वितीय क्रमांक: प्रियंका मनोज वकटे, समृद्धी महिला समूह, वडाळी (नांदुरा) – बॉलपेन व घासणी उत्पादन; पारितोषिक ७ हजार रुपये.

तृतीय क्रमांक: पूजा नंदकिशोर देशमुख, सावित्रीबाई फुले समूह, वरखेड (मलकापूर) – पापड व चिप्स उत्पादन; पारितोषिक ५ हजार रुपये.

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा महोत्सव बुलढाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top