Mahabreaking

[breaking_news]

140 donors donate: ईद-ए-मिलादुन्नबीला मानवतेचा जागर; १४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

140 donors donate: प्रेम, शांती, दया आणि मानवतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) ‘खिदमते खल्क फाउंडेशन’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

donate

 रक्ताला जात-धर्म नसतो, माणुसकीचा धर्म मोठा! रक्तदानातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

साखरखेर्डा : प्रेम, शांती, दया आणि मानवतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) ‘खिदमते खल्क फाउंडेशन’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत ‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या अनेक ठिकाणी रक्ताची गरज भासत असताना गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला.

या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुस्लिम बांधवांनीच नव्हे, तर हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, विक्की जगताप, श्याम खरात, डॉ. प्रवीण ठोसरे, मंगलसिंग मोहने, दीपक खरात आणि मयूर जयस्वाल यांच्यासह अनेक हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या सहभागातून सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

‘रक्ताला कोणताही धर्म किंवा जात नसते; रक्तदानातून केवळ माणसाचा जीव वाचतो,’ हा मानवतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळपासूनच रक्तदानासाठी शिबिरस्थळी तरुणांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रक्तसंकलनासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक तसेच वाशिम ब्लड सेंटरचे संचालक प्रकाश सांगळे, डॉ. कृष्णा सांगळे, संकेत, सुजाता यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, टी-शर्ट आणि पेन देऊन गौरविण्यात आले.

फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी खिदमते खल्क फाउंडेशनचे शे. राजीक, मो. इशरत, मो. समीउलहक, राजू शे. कमर, आबिद पठाण, सिकंदर पठाण, अर्शद आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिरातून सामाजिक एकोपा, मानवता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top