festivals : धार्मिक उत्सवांतून सामाजिक हित साधत विधायक उपक्रम हाती घ्यावेत. जबाबदारीचे भान ठेवून शांतता प्रस्थापित करण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य जोपासावे. सर्व धर्मीयांनी पारंपरिक धार्मिक उत्सव साजरे करताना राष्ट्रीय एकात्मता व सकारात्मक विचारसरणीला प्राधान्य द्यावे. सकारात्मक विचारांची माणसे गावासोबतच स्वतःचाही विकास साधू शकतात. त्यामुळे सामाजिक सलोख्यातून धार्मिक उत्सव साजरे करताना विधायक कार्य आणि सकारात्मक विचार कृतीत उतरवून प्रगती साधणे शक्य आहे. विशेषतः तरुणांनी हे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांनी केले.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करा : शांतता समिती सभेत आवाहन
बोरगाव मंजू : धार्मिक उत्सवांतून सामाजिक हित साधत विधायक उपक्रम हाती घ्यावेत. जबाबदारीचे भान ठेवून शांतता प्रस्थापित करण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य जोपासावे. सर्व धर्मीयांनी पारंपरिक धार्मिक उत्सव साजरे करताना राष्ट्रीय एकात्मता व सकारात्मक विचारसरणीला प्राधान्य द्यावे. सकारात्मक विचारांची माणसे गावासोबतच स्वतःचाही विकास साधू शकतात. त्यामुळे सामाजिक सलोख्यातून धार्मिक उत्सव साजरे करताना विधायक कार्य आणि सकारात्मक विचार कृतीत उतरवून प्रगती साधणे शक्य आहे. विशेषतः तरुणांनी हे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांनी केले.
आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे होत्या. यावेळी प्रमुख उपस्थितीत ठाणेदार सुनील वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, सर्व पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी मार्गदर्शन करताना धार्मिक उत्सव साजरे करताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच शासनाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीसह सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गणेश मंडळांनी राष्ट्रीय एकात्मता वाढविणारे तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
सार्वजनिक मिरवणूक मार्गाची पाहणी
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाच्या पथकाने मिरवणूक मार्गावरील वाहतुकीच्या संभाव्य अडचणी, अरुंद रस्ते तसेच इतर बाबींची पाहणी करून त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुनील खेडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तायडे गुरुजी, संतोष चक्रनारायण, संतोष गवई, पोलीस कर्मचारी नितीन गवई, अक्षय देशमुख यांच्यासह शांतता समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

