Mahabreaking

[breaking_news]

Buses will halt :बोरगाव मंजूत बाजार समिती परिसर,गजानन महाराज मंदिर परिसरात थांबणार बस

Buses will halt :अकोला ते मुर्तिजापूर मार्गावरील बोरगाव मंजू येथे एसटी बसेसना अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) अकोला विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

Buses will halt

प्रवासी मित्र संघाच्या पाठपुराव्याला यश;  प्रवाशांना मोठा दिलासा

संजय तायडे

बोरगाव मंजू : अकोला ते मुर्तिजापूर मार्गावरील बोरगाव मंजू येथे एसटी बसेसना अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) अकोला विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

बोरगाव मंजू परिसरात गिट्टी खदानींवर धडक तपासणी; अवैध उत्खननाविरोधात कारवाईचे संकेत

बोरगाव मंजू येथील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात एसटी बस थांबा देण्याबाबत स्थानिक प्रवासी मित्र संघाच्या वतीने मागणी करण्यात आली होती. या संदर्भात अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी निवेदन सादर केले होते. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यात आली.

दि. १३ मार्च रोजी वाहतूक निरीक्षकांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली असता, बोरगाव मंजू येथील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर तसेच संत श्री गजानन महाराज मंदिरासमोरील ठिकाणी बस थांबविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. याठिकाणी जड वाहनांसाठी बायपास मार्गही उपलब्ध असल्याने एसटी बस थांबा देण्यास कोणतीही अडचण नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

यानुसार अकोला विभागीय कार्यालयाने अकोला ते मुर्तिजापूर मार्गावरील सर्व बसेसना बोरगाव मंजू येथे थांबा देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांनी संत श्री गजानन महाराज मंदिरासमोरील बोर्डाजवळ चढ-उतार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या नव्या थांब्यामुळे प्रवास भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांकडून बोरगाव मंजू थांब्याचेच भाडे आकारण्यात येणार असून चालक व वाहकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीत येणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना थेट बससेवेचा लाभ मिळणार असल्याने दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. बस थांबा मिळण्यासाठी धनंजय देशमुख,मणिष तिवारी, देवानंद मोहोड, यांनी पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top