Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction :वाडेगाव येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction :वाडेगाव येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Buddhist communitys bride-groom introduction :वाडेगाव येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Buddhist communitys bride-groom introduction :बाळापूर तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बौद्ध समाज वधू-वर परिचय मेळावा सोमवार, २ मार्च रोजी वाडेगाव येथील उत्सव लॉन येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.

Buddhist communitys bride-groom introduction

राहुल सोनोने 
वाडेगाव : बाळापूर तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बौद्ध समाज वधू-वर परिचय मेळावा सोमवार, २ मार्च रोजी वाडेगाव येथील उत्सव लॉन येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.

चान्नी बसस्थानकाजवळ मधमाश्यांचा हल्ला; १५० पेक्षा अधिक डंख, एक जण गंभीर  

बाळापूर तालुका बौद्ध समाज व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाजातील उपवर मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अनाठायी खर्च कमी व्हावा तसेच योग्य जोडीदार शोधण्यास मदत व्हावी, या उद्देशाने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. वानखेडे, महासचिव नंदू कुमार डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद इंगळे, आम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, भंते राज ज्योती, प्रभाताई सिरसाठ, नगरसेवक पराग गवई, प्रदीप सिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. याशिवाय अकोला व वाशिम जिल्ह्यातील समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात सुमारे ४५० युवक-युवतींची नोंदणी झाली असून त्याची पुस्तिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोणत्याही उपासक-उपासिकांचे नाव नोंदवायचे असल्यास देवानंद अंभोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
परिचय मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी युवकवर्ग तसेच जेष्ठ समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top