Brutal murder : खंडाळा एमआयडीसी परिसरात एका तरुण व्यावसायिकाचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी (४ मार्च) सकाळी उघडकीस आली. वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे ‘आपलं कलेक्शन’ नावाचे कापड दुकान चालवणारा राहुल खुशालराव बाजड (वय अंदाजे २५-३०) हा तरुण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणी मेहकर पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे.

खंडाळा एमआयडीसी परिसरात आढळला मृतदेह: प्रेमप्रकरणातून खून झाल्याची चर्चा
मेहकर: खंडाळा एमआयडीसी परिसरात एका तरुण व्यावसायिकाचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी (४ मार्च) सकाळी उघडकीस आली. वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे ‘आपलं कलेक्शन’ नावाचे कापड दुकान चालवणारा राहुल खुशालराव बाजड (वय अंदाजे २५-३०) हा तरुण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणी मेहकर पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे.
सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांना अटक
राहुल बाजड हा मूळचा मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. मागील काही वर्षांपासून तो वाशीम जिल्ह्यातील जाम आढाव येथे मामाकडे राहत होता. केनवड येथे त्याने स्वतःचे कापड दुकान सुरू करून व्यवसाय उभारला होता. प्राथमिक माहितीनुसार, ३ मार्च रोजी अज्ञात आरोपीने राहुलचा चेहरा दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ४ मार्चच्या सकाळी ही घटना समोर आल्यानंतर मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ठाणेदार व्यंकटेश आलेवार, एपीआय संदीप बिरांजे, एपीआय जारवाल, पोहेकॉ लक्ष्मण कटक आणि मोहम्मद परसुवाले यांनी घटनास्थळी पंचनामा केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, हा खून प्रेमप्रकरणातून झाला असावा, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृतरीत्या कोणताही निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.दरम्यान, मेहकर पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.या घटनेमुळे मेहकर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

