Mahabreaking

[breaking_news]

Bribe: १४.७८ लाखांच्या बिलासाठी सहा हजाराची मागितली लाच; सहायक कार्यक्रम अधिकारी गजाआड 

Bribe: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अकोला पथकाने मंगळवारी मोठी कारवाई करत पंचायत समिती, तेल्हारा येथील सहायक कार्यक्रम अधिकारी संदीप विजय झाडोकार यांना ₹६ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात पंचायत समितीतील तांत्रिक सहायक शिरीष सदापुरे यांनाही आरोपी करण्यात आले असून, दोघांविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribe

 तेल्हारा पंचायत समितीत अकोला एसीबीची कारवाई ; तांत्रिक सहायकावरही गुन्हा

तेल्हारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अकोला पथकाने मंगळवारी मोठी कारवाई करत पंचायत समिती, तेल्हारा येथील सहायक कार्यक्रम अधिकारी संदीप विजय झाडोकार यांना ₹६ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात पंचायत समितीतील तांत्रिक सहायक शिरीष सदापुरे यांनाही आरोपी करण्यात आले असून, दोघांविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत. सन २०२३-२४ मध्ये ग्रामपंचायत पिवंदळ खुर्द (ता. तेल्हारा) येथे मंजूर झालेल्या आर.सी. मातोश्री पांदण रस्ता कामासाठी त्यांनी साहित्याचा पुरवठा केला होता. या कामाचे ₹१४ लाख ७८ हजारांचे बिल ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले होते.

बिलाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी संदीप झाडोकार आणि तांत्रिक सहायक शिरीष सदापुरे यांनी सुरुवातीला ₹७ हजारांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला. त्यानंतर कामाचे बिल मंजूर झाल्यावर एकूण रकमेच्या प्रमाणात आणखी लाच मागितल्याची तक्रारही एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी ८ जुलै २०२६ रोजी करण्यात आली. पडताळणीत संदीप झाडोकार यांनी ₹६ हजारांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे, तर शिरीष सदापुरे यांनी लाचेच्या व्यवहारास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. यानंतर १४ जुलै २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. आर. के. बार गार्डन अँड रेस्टॉरंट, तेल्हारा येथे तक्रारदाराकडून ₹६ हजारांची लाच स्वीकारताना संदीप झाडोकार यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर व एसीबी अकोला पथकाने केली.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारी व्यक्ती कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यात येईल तसेच तक्रारदाराचे वैध शासकीय काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top