Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Deputy Chief Minister Eknath Shinde :पोहरादेवी येथे संतांच्या चरणी नतमस्तक; समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deputy Chief Minister Eknath Shinde : श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. १४ रोजी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे भेट देऊन संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

Deputy Chief Minister Eknath Shinde

वाशिम : श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. १४ रोजी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे भेट देऊन संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

वाशिमसह परिसरातील बातम्या वाचण्यासाठी वऱ्हाड▾ला भेट 

यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, महंत सुनील महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संतांच्या विचारांचा समाज घडविण्यात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सत्य, अहिंसा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांनी दिला असून त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Deputy Chief Minister Eknath Shinde

पोहरादेवी हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून भाविकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व्यवस्था व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने भाविक, समाजबांधव व मान्यवर उपस्थित होते. संतांच्या चरणी नतमस्तक होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शांतता, सामाजिक सलोखा व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. तसेच महंत, विश्वस्त व ट्रस्टी यांचीही उपस्थिती होती.

क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी क्राइम ला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top