Mahabreaking

[breaking_news]

Borgaon Manju police :बोरगाव मंजू पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; ९ जण ताब्यात, ७०,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Borgaon Manju police :पोलीस अधीक्षक   अर्चित  चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांनी १ जानेवारी रोजी मोठी कारवाई करत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले असून तब्बल ७०,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Borgaon Manju police

संजय तायडे

बोरगाव मंजू :  पोलीस अधीक्षक   अर्चित  चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांनी १ जानेवारी रोजी मोठी कारवाई करत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले असून तब्बल ७०,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. १ जानेवारी २०२६ रोजी बोरगाव मंजू पोलिसांना माहिती मिळाली की, बोरगाव मंजू येथील योगेश फुटवेअर दुकानाच्या बाजूला असलेल्या एका दुकानात इम्रान उर्फ किनारा गावंडे व वैभव खेडकर हे एलसीडी टीव्ही स्क्रीनवर ‘फल गेम एशिया’ नावाचा ऑनलाईन जुगार खेळ चालवत आहेत. ० ते ९ अंकांच्या आकड्यांवर छापील चार्टद्वारे नागरिकांकडून पैसे लावून अवैधरित्या जुगार खेळविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी टकाई कंपनीचा एलसीडी टीव्ही (कि.अं. १५,००० रु.), २ सीपीयू, २ मॉनिटर, २ कीबोर्ड व २ माऊस (कि.अं. २०,००० रु.), इतर साहित्य (कि.अं.२,००० रु.), ३ मोबाईल फोन (कि.अं. ३०,००० रु.), तसेच ३,४१० रुपये रोख रक्कम, असा एकूण ७०,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात पोलिसांनी  शुभम रविंद्र चौधरी (३१), रा. भवानीपेठ, बोरगाव मंजू ,ऋषिकेश दत्ता कुटे (२३), रा. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा, कल्पक भानुदास इंगोले (२३), रा. मोगव्हाण दुबे, जि. वाशिम, शंकर श्रीराम शिंद्रे (४०), रा. वाशींबा, जि. अकोला, विजय पांडुरंग रायपूरे (४८), रा. इटकी अंतरगाव, ता. दर्यापूर, जि. अमरावती, गुलाबखा हबीबखा (६०), रा. रामजी नगर, बोरगाव मंजू, प्रकाश रामचंद्र दामोदर (६५), रा. रामजी नगर, बोरगाव मंजू, मोहम्मद नईम मोहम्मद हकीम (३४), रा. गुलजारपुरा, बोरगाव मंजू, सय्यद साकीब सय्यद लियाकत (३८), रा. मुल्लापुरा, बोरगाव मंजू यांना ताब्यात घेतले. तसेच फरार आरोपी विलास गावंडे व वैभव खेडकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांड यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ तसेच बीएनएस कलम ४० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी.चंद्रकांत रेड्डी , उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पो.का. अक्षय देशमुख, पंकज बोराखडे, आकाश जंजाळ, अजिंक्य हळदे व अनिल राठोड यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top