Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Sanjay Tayade Guruji :जबाबदारीची जाणीव ठेवा, यशाचे शिखर गाठा – संजय तायडे गुरुजी

Sanjay Tayade Guruji : आजच्या गतिमान व बदलत्या काळात उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. विद्यार्थी दशेत आत्मपरीक्षण करून ध्येय, चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीवर वाटचाल केली तर यश निश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व यशाचे शिखर गाठून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन संजय तायडे गुरुजी यांनी केले.

Sanjay Tayade Guruji

नववर्ष स्वागत व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न : भटकर अभ्यासिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना संविधानाची भेट

बोरगाव मंजू : आजच्या गतिमान व बदलत्या काळात उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. विद्यार्थी दशेत आत्मपरीक्षण करून ध्येय, चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीवर वाटचाल केली तर यश निश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व यशाचे शिखर गाठून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन संजय तायडे गुरुजी यांनी केले.

ते भटकर अभ्यासिकेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व नववर्ष स्वागत उत्सवप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तायडे गुरुजी होते.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये दादाराव सुलताने, सिनेअभिनेता शाम पिपळकर, सहदेव मोहन गुरुजी, नंदकुमार देशमुख, वसंत वाघमारे, विचुंरकर, कुकडे गुरुजी, जोशी गुरुजी, नंदलाल यादव, हिम्मतराव मांगे तसेच अभ्यासिकेचे अध्यक्ष गजानन भटकर यांचा समावेश होता. याशिवाय मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रसंगी सिनेअभिनेता शाम पिपळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये आत्मसात करावीत. सकारात्मक विचारसरणी अंगीकारून जीवनात बदल घडवावा, असे मार्गदर्शन केले.दादाराव सुलताने व सहदेव मोहन गुरुजी यांनीही विचार व्यक्त करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी भटकर अभ्यासिकेच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी शगुन मोरेपायल बागडे यांना भारतीय संविधानाची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका पूजा खेमराज भटकर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यासिका संचालक गजानन भटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्यवस्थापिका पूजा खेमराज भटकर यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top