BNP wins in Bangladesh : बांग्लादेशमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठा विजय मिळवला आहे. २९९ पैकी २०९ जागा जिंकत पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेला १५० चा टप्पा पार केला. आतापर्यंत २८६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

ढाका : बांग्लादेशमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठा विजय मिळवला आहे. २९९ पैकी २०९ जागा जिंकत पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेला १५० चा टप्पा पार केला. आतापर्यंत २८६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीला ७० जागांवर समाधान मानावे लागले. जमातचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी ढाका-१५ मतदारसंघातून विजय मिळवला. जवळपास २० वर्षांनंतर देशात BNPची सत्ता स्थापन झाली असून २००८ ते २०२४ या कालावधीत शेख हसीना यांच्या आवामी लीगचे वर्चस्व होते.
या विजयामुळे माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र व BNP अध्यक्ष तारिक रहमान यांचे पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवून दोन्ही ठिकाणी विजय मिळवला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ते १७ वर्षांनंतर देशात परतले होते. बांग्लादेशात तब्बल ३५ वर्षांनंतर पुरुष पंतप्रधान होणार आहेत. १९८८ मध्ये काझी जफर अहमद पंतप्रधान झाले होते. त्यानंतर १९९१ ते २०२४ या काळात शेख हसीना आणि खालिदा जिया या दोघींचेच राजकारणावर वर्चस्व राहिले.
जमात व इतर पक्षांना फटका
निवडणुकीत जमात-ए-इस्लामीला मोठा पराभव पत्करावा लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून पुढे आलेल्या नॅशनल सिटीझन पार्टीला (NCP)ही मतदारांनी नाकारले.
BNPच्या एकतर्फी विजयामागील प्रमुख कारणे
आवामी लीगचे, विशेषतः हिंदू मतदारांचे मत BNPकडे वळले; गोपालगंजसह खुलना, सिलहट, चटगाव, ठाकुरगंज येथे विजय.बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामाला विरोध केल्याचा जमातचा भूतकाळ मतदारांच्या लक्षात राहिला. NCPमध्ये अंतर्गत मतभेद व जमातसोबतची आघाडी मतदारांना न पटल्याने पूर्ण नकार. या निकालामुळे बांग्लादेशातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडून आला असून पुढील काळात BNPच्या नेतृत्वाखालील सरकारकडे देशाचे लक्ष लागले आहे.

