Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Bhagwan Mahavir Jayanti :बोरगावात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Mahavir Jayanti : बोरगाव मंजू येथे भगवान महावीर यांची जयंती ‘महावीर जन्मकल्याणक’ म्हणून धार्मिक उत्साह, भक्तीमय वातावरण आणि मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गांवरून भव्य शोभायात्रा आणि नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. *‘जिओ और जीने दो’*चा संदेश देत अहिंसा, करुणा आणि शांततेचा जागर करण्यात आला.

Bhagwan Mahavir Jayanti

अहिंसा, करुणा आणि ‘जिओ और जीने दो’चा संदेश देत भव्य शोभायात्रा

संजय तायडे

बोरगाव मंजू  : बोरगाव मंजू येथे भगवान महावीर यांची जयंती ‘महावीर जन्मकल्याणक’ म्हणून धार्मिक उत्साह, भक्तीमय वातावरण आणि मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गांवरून भव्य शोभायात्रा आणि नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. *‘जिओ और जीने दो’*चा संदेश देत अहिंसा, करुणा आणि शांततेचा जागर करण्यात आला.

सकाळी शहराच्या मध्यवर्ती मेन रोडवरील दिगंबर जैन मंदिरातून भगवान महावीरांची पालखीत सजवलेली मूर्ती आकर्षक रथातून मिरवणुकीसाठी नेण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत जैन बांधव, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि *‘महावीर स्वामी की जय’*च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित विविध देखावे आणि सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली. यावेळी दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीची पूजा-अर्चा, अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.

समाज बांधवांनी भगवान महावीरांनी दिलेल्या ‘अहिंसा परमो धर्म’, करुणा, शांतता आणि अपरिग्रह या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात भगवान महावीर स्वामींच्या विचारांची अधिक आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

नगर प्रदक्षिणेदरम्यान भाविकांनी ठिकठिकाणी भगवान महावीरांच्या मूर्तीचे पूजन करून श्रद्धा व्यक्त केली. शोभायात्रेचा समारोप पुन्हा दिगंबर जैन मंदिरात महाआरतीने झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top