Mahabreaking

[breaking_news]

  Begging protest against :तत्कालीन ग्रामसेवकाविरोधात ‘भिक मांगो’ आंदोलन; सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांचा अनोखा एल्गार

Begging protest against : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. येथील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात ‘भिक मांगो’ हे अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या अनोख्या आंदोलनाची दिवसभर पंचायत समिती परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

patur

   भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पंचायत समितीत भिक्षा मागून आंदोलन; गोळा झालेले २१३ रुपये बीडीओंकडे सुपूर्द

निशांत गवई 

पातूर   : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. येथील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात ‘भिक मांगो’ हे अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या अनोख्या आंदोलनाची दिवसभर पंचायत समिती परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

add

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बु. येथील तत्कालीन ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विजयकुमार ताले यांनी सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान त्यांनी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडे प्रतीकात्मक स्वरूपात भिक्षा मागितली.

add

या आंदोलनातून २१३ रुपये इतकी रक्कम जमा झाली. ही रक्कम त्यांनी प्रतीकात्मक मदत म्हणून गटविकास अधिकारी गुजर यांच्या स्वाधीन केली. भ्रष्टाचारामुळे शासनाच्या निधीची झालेली हानी भरून काढण्यासाठी ही प्रतीकात्मक कृती असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी विजयकुमार ताले यांच्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीची पंचायत समिती परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.

add

कायदो व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पातूर पोलिसांनी आंदोलनस्थळी कडक बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आंदोलन शांततेत पार पडले.

दरम्यान, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top