Mahabreaking

[breaking_news]

Ban on DJs :डीजेवर बंदी, मिरवणुकीत मोठ्या वाहनांना मज्जाव; नियमांचे पालन करण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांचे आवाहन

Ban on DJs : आपल्या गावाचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. धार्मिक समन्वयातून सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे करताना एकमेकांच्या भावना आणि श्रद्धांचा आदर राखावा. विविधतेतून एकता साधत गावातील शांतता, जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तरुणांसह सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बोरगाव मंजूचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.

Ban on DJs
धार्मिक समन्वयातून सामाजिक एकोपा जोपासा; आपल्या गावाचे वैभव आपणच वाढवा!

बोरगाव मंजू : आपल्या गावाचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. धार्मिक समन्वयातून सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे करताना एकमेकांच्या भावना आणि श्रद्धांचा आदर राखावा. विविधतेतून एकता साधत गावातील शांतता, जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तरुणांसह सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बोरगाव मंजूचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.
सार्वजनिक नवरात्रोत्सव, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार सुनील वानखडे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकमेकांशी संवाद साधावा. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक बंधुभाव वृद्धिंगत करावा. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सामाजिक सलोखा आणि परस्परांच्या भावनांचा आदर राखून उत्सव साजरे करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडले. सर्व धर्मीयांनी समन्वय राखून सण-उत्सव साजरे करावेत आणि गावातील शांततेची परंपरा कायम ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डीजेवर बंदी; मिरवणुकीत मोठ्या वाहनांना मज्जाव

सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकांदरम्यान शहरातील मुख्य मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश ठाणेदार सुनील वानखडे यांनी दिले. मिरवणुकीत मोठ्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शक्यतो लहान वाहनांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मिरवणुकांदरम्यान डीजे वाजविण्यावर बंदी असल्याने संबंधित मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीचे सूत्रसंचालन संतोष चक्रनारायण यांनी केले, तर पोलीस कर्मचारी नितीन गवई यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top