Balapurs Lal Savari :मोहर्रमच्या पवित्र पर्वानिमित्त बाळापूर शहरात गुरुवार (दि. २५ जून) आणि शुक्रवार (दि. २६ जून) रोजी पारंपरिक सवारी उत्सव श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. अनेक दशकांपासून अखंड सुरू असलेली ही ऐतिहासिक परंपरा जामोदे परिवार आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पणाने जपत आहे.

जामोदे परिवाराने जपली पिढ्यानपिढ्यांची परंपरा; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
बाळापूर : मोहर्रमच्या पवित्र पर्वानिमित्त बाळापूर शहरात गुरुवार (दि. २५ जून) आणि शुक्रवार (दि. २६ जून) रोजी पारंपरिक सवारी उत्सव श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. अनेक दशकांपासून अखंड सुरू असलेली ही ऐतिहासिक परंपरा जामोदे परिवार आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पणाने जपत आहे.

शहरातील लाल सवारी चौकातील ‘धोबीची लाल सवारी’ ही मोहर्रम उत्सवातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते. परंपरेनुसार स्वर्गीय अंबुजी मोकळकर यांच्या मांडीवर प्रथम लाल सवारीचे आगमन झाले होते. त्यानंतर ही सवारी परिसरात ‘धोबीची सवारी’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक बनली.
पूर्वजांकडून मिळालेला हा धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपत स्वर्गीय जयराम जामोदे यांचे सुपुत्र सुरेश (बंडू) जामोदे, स्वर्गीय बळीराम जामोदे यांचे सुपुत्र देविदास जामोदे तसेच त्यांचे कुटुंबीय ही परंपरा आजही अखंडपणे पुढे नेत आहेत. काही कारणांमुळे पूर्वीप्रमाणे मोठी सवारी विराजमान होत नसली, तरी परंपरेनुसार छोटी लाल सवारी आजही जामोदे परिवाराकडेच विराजमान केली जाते.
मोहर्रमच्या पवित्र दिवसांत जामोदे परिवाराच्या निवासस्थानी लाल सवारीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो. अनेक वर्षांपासून छोटी लाल सवारी उचलण्याची सेवा करणारे सादिका पहलवान हे देखील या परंपरेचा अविभाज्य भाग बनले आहेत.

लाल सवारीच्या दर्शनासाठी बाळापूर शहरासह परिसरातील विविध गावांमधून आणि बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. भाविकांच्या उपस्थितीमुळे लाल सवारी चौकात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जामोदे परिवाराने पिढ्यानपिढ्या जपलेली ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आजही मोहर्रम उत्सवाची ओळख कायम ठेवत असून, समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन घडवत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

