Mahabreaking

[breaking_news]

sudden death foiled: अकस्मात मृत्यूचा बनाव फसला; अकोला LCB ने ३ तासांत केला खुनाचा उलगडा

sudden death foiled: डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत छडा लावत तो अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे उघड केले. या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

sudden death

   रेल्वे गेटजवळील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण; मुख्य आरोपी ३ तासांत जेरबंद

संजय तायडे

अकोला : डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत छडा लावत तो अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे उघड केले. या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

add

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी रेल्वे गेट परिसरात एक अनोळखी पुरुष जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर डाबकी रोड पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक ३७/२०२६, कलम १९४ भा.ना.सु.सं. अन्वये नोंद करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना सविस्तर चौकशीचे आदेश दिले. लेव्हरकर यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, मृताच्या अंगावर ठिकठिकाणी जखमांचे निशाण आढळून आले. त्यामुळे हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असावा, असा संशय निर्माण झाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून तपासाला वेग देण्यात आला.

तपासादरम्यान मृत व्यक्तीला रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता तो सुरेश रतनलाल अग्रवाल (रा. मोहरी देवी, खंडेलवाल शाळेमागे, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला) असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, मृतक राजू पांडुरंग इंगळे (वय ४२, रा. फडके नगर, शिवराणा चौक, डाबकी रोड, अकोला) याच्यासोबत पैशांच्या व्यवहारावरून व जुन्या वादातून मारहाण केल्याची कबुली त्याने दिली. या मारहाणीत राजू इंगळे याचा मृत्यू झाल्याचेही त्याने सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि वेगवान तपासाच्या जोरावर हे प्रकरण अकस्मात मृत्यूचे नसून खुनाचे असल्याचे स्पष्ट केले. मुख्य आरोपीला अवघ्या तीन तासांत ताब्यात घेण्यात आले असून डाबकी रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, उपनिरीक्षक माजीद पठाण तसेच पोलिस अंमलदार शेख हसन, अब्दुल माजिद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसीमोद्दीन, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड व भीमराव दिपके यांनी पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top