Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Annis : दिग्रस बु येथे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न; अंनिसची तात्काळ दखल

Annis : पातुर तालुक्यातील दिग्रस बु येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या अंधश्रद्धाजन्य प्रकाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ची टीम आणि पोलिस दलाने नुकतीच घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत हा संपूर्ण प्रकार काही टवाळखोरांनी खोडसाळ उद्देशाने घडवून आणल्याचे समोर आले आहे.

Annis
टवाळखोरांच्या खोडसाळपणातून झालेल्या प्रकाराची अंनिसकडून सखोल चौकशी

राहुल सोनोने 

 दिग्रस बु : पातुर तालुक्यातील दिग्रस बु येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या अंधश्रद्धाजन्य प्रकाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ची टीम आणि पोलिस दलाने नुकतीच घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत हा संपूर्ण प्रकार काही टवाळखोरांनी खोडसाळ उद्देशाने घडवून आणल्याचे समोर आले आहे.

अंनिसच्या भेटीदरम्यान महादेवराव भुईभार, बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय तिडके, अॅड. सविता खोटरे, शारदा वानरे आदींचा समावेश होता. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. गावात भिती व दहशत निर्माण करण्यासाठी काही व्यक्तींनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे निष्पन्न झाले.

अंनिसच्या चमूने गावकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, अशा अंधश्रद्धाजन्य घटनांना घाबरून न जाता तर्कशुद्धपणे सामोरे जाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, गावकऱ्यांची भीती दूर करण्यासाठी लवकरच अंनिसतर्फे दिग्रस बु येथे जाहीर प्रबोधन सभा व चमत्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात पोलिस उपनिरीक्षक भगवंत शिंदे यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. स्थानिक पोलिसांनीही गावात शांतता व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे कळते.

या कार्यक्रमाला सरपंच आशा कराळे यांचे पती, पोलीस पाटील नितीन गवई, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश कुकडकर, चान्नी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवंत शिंदे तसेच गावातील अशोक गवई, रमेश गवई, बाळू गवई, पांडुरंग चोरे, अनंता कुकडकर, महादेव सरप, विश्वंभर बराटे, डबेराव बराटे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top