Mahabreaking

[breaking_news]

Voting closed : मतदान ईव्हीएममध्ये बंद; आता 19 दिवस ‘विजयगणिताची’ आकडेमोड!

Voting closed : महिनाभराच्या राजकीय धुरळ्यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी झालेली मतदान प्रक्रिया आता संपली असून, मतदारांची मते ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. जिल्ह्यातील दहा नगर पालिकांसाठी सकाळी 7.30 ते मतदान संपेप र्यंत 69.42 टक्के मतदान झाले. आता निकाल २१ डिसेंबरला लागणार असल्याने पुढील वीस दिवस राजकीय पक्षांमध्ये विजयाच्या आकडेमोडीचा काथ्याकूट सुरू राहणार आहे. दहा पालिकांतील १० नगराध्यक्षांसह २५३ सदस्यांसाठी हे मतदान पार पडले.

Voting closed
दहा नगर पालिकांसाठी जिल्ह्रयात 69.42 टक्के मतदान , बोगस मतदारांमुळे गाजले मतदान

बुलढाणा : महिनाभराच्या राजकीय धुरळ्यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी झालेली मतदान प्रक्रिया आता संपली असून, मतदारांची मते ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. जिल्ह्यातील दहा नगर पालिकांसाठी सकाळी 7.30 ते मतदान संपेप र्यंत 69.42 टक्के मतदान झाले. आता निकाल २१ डिसेंबरला लागणार असल्याने पुढील वीस दिवस राजकीय पक्षांमध्ये विजयाच्या आकडेमोडीचा काथ्याकूट सुरू राहणार आहे. दहा पालिकांतील १० नगराध्यक्षांसह २५३ सदस्यांसाठी हे मतदान पार पडले.

सिंदखेड राजात सर्वाधिक तर बुलढाण्यात सर्वात कमी मतदान

जिल्ह्रयात दहा नगर पालिकांसाठी झालेल्या मतदानात सर्वात जास्त मतदान सिंदखेड नगर पालिकेसाठी झाले. या पालिकेसाठी 85.08 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान बुलढाणा पालिकेत झाले. बुलढाण्यात केवळ 54 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. कमी मतदान होण्याची परंपरा बुलढाण्यात कायम राहीली. इतर पालिकांमध्ये चिखली 71.02 टक्के, जळगाव जामोद 67.87 टक्के, खामगाव 70.65 टक्के, लोणार 72.26 टक्के, मलकापूर 74.04 टक्के, मेहकर 74.41 टक्के, नांदुरा 74.59 टक्के, शेगाव 68.98 टक्के मतदान झाले.

बोगस मतदारांच्या चर्चेने मतदान प्रक्रियेत तणाव

मतदानाला सकाळी ७.३० वाजता शांततेत सुरुवात झाली होती. परंतु काही वेळातच बुलढाण्यात बोगस मतदारांच्या संशयित हालचालींची चर्चा सुरू झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापले. या प्रकरणी तीन गुन्हे रात्री उशिरापर्यंत नोंदविण्यात आले.
दहा पालिकांसाठीच मतदान – न्यायालयीन स्थगितीचा फटका
न्यायालयातील प्रलंबित याचिकांमुळे देऊळगाव राजा, तसेच जळगाव जामोद, खामगाव आणि शेगाव येथील ९ प्रभागातील निवडणूक स्थगित झाल्याने या फेरीत प्रत्यक्ष मतदान फक्त दहा पालिकांसाठीच झाले. जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, व्हीबीए, बसपा, सपा तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळाली.

बुलढाण्यात अभूतपूर्व गोंधळ – बोगस मतदानाचे आरोप-प्रत्यारोप

परंपरेने संयमी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा शहरात मतदानादरम्यान बोगस मतदारांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तीन गुन्ह्यांची नोंद सुरू होती.

 

ईव्हीएम बिघाड – राखीव यंत्रांमुळे मतदान सुरळीत

जिल्ह्यात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान तात्पुरते थांबले.
मात्र वेळेत राखीव मशीन बसवण्यात आल्याने प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top