Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी

As Temperatures Soar : अकोल्यासह विदर्भात गत काही दिवसांपासून पारा चढताच आहे. गुरूवारीही अकोला शहराचा पारा 44 अंश पार झाला. येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्मालाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली असून, आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांसाठी ‘काय करावे? काय करु नये?’याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

As Temperatures Soar

नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अकोला : अकोल्यासह विदर्भात गत काही दिवसांपासून पारा चढताच आहे. गुरूवारीही अकोला शहराचा पारा 44 अंश पार झाला. येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्मालाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली असून, आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांसाठी ‘काय करावे? काय करु नये?’याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

उष्माघात उपाययोजना करण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 13 मार्च  व दि. 15 एप्रिल  रोजी सर्व यंत्रणांची आढावा सभा घेऊन निर्देश देण्यात आले आहेत. उष्मालाट नियंत्रणाच्या अनुषंगाने आयुक्त महानगरपालिका यांच्या नियंत्रणात महानगरपालिका स्तरावर, सर्व मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेत नगरपालिका क्षेत्रामध्ये व सर्व तालुका गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेत ग्रामस्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळा, शिकवणी वर्ग याठिकाणी उष्मा लाटेच्या अनुषंगाने उपायुक्त यांनी भेटी द्याव्यात व आवश्यक सुविधाची तपासणी करावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातील तयारीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल स्टाफ यांचे उष्माघात उपाययोजनेबाबत प्रशिक्षण फेब्रुवारी व मार्चमध्ये पुर्ण करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आवश्यक खाटा, औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथे तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे उष्माघाताच्या अनुषंगाने शीतकक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

सर्व प्राथमिक केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविदयालय येथे 137 खाटा उष्माघात रुग्णांकरीता राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व आरोग्य रुग्णालयामध्ये उष्माघाताचे अनुषंगाने आयव्ही फ्लुईडस, आईसपॅक ओआरएस व इतर अनुषंगिक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.  विविध कामगार आस्थपनामध्ये या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यकतेनुसार कामाच्या वेळेत बदल व त्यानुसार नियोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

दक्षता सूचना

  1. दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
  2. तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  3. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.
  4. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
  5. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top