Mahabreaking

[breaking_news]

Arjun Thosre: देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी अर्जुन ठोसरे रुजू; जनतेच्या सहकार्यावर भर

Arjun Thosre: देऊळगाव राजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून अर्जुन ठोसरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर ठोसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Arjun Thosre

   कायदा-सुव्यवस्थेसह जनजागृती उपक्रमांवर भर देणार; अर्जुन ठोसरे यांनी स्वीकारला पदभार

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून अर्जुन ठोसरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर ठोसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी अर्जुन ठोसरे हे अमरावती येथे कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, देऊळगाव राजा उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केले.

अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, सामाजिक सुरक्षितता आणि कायदेविषयक जनजागृती यांसंदर्भात अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले होते. अशाच प्रकारचे जनजागृती उपक्रम देऊळगाव राजा शहर आणि परिसरातही राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

दरम्यान, तालुका पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अर्जुन ठोसरे यांचे स्वागत करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी होण्याबरोबरच नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top