Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

tribute to Ajitdada  :अजितदादांना डोणगाव येथे सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली

tribute to Ajitdada  : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारी रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत अजितदादांसह त्यांच्यासोबत असलेले वैमानिक व बॉडीगार्ड यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर डोणगाव येथे 29 जानेवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायतीच्या आवारात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

tribute to Ajitdada

  आदरांजली वाहण्यासाठी महिलांचीही मोठी उपस्थिती

डोणगाव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारी रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत अजितदादांसह त्यांच्यासोबत असलेले वैमानिक व बॉडीगार्ड यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर डोणगाव येथे 29 जानेवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायतीच्या आवारात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

श्रद्धांजली सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, शिवाजी शिक्षण संस्था डोणगावचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, डोणगावचे सरपंच चरण आखाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, गोपाल आखाडे, मुरलीधर लांभाडे, ओम भालेराव, जैनुल आबेद्दीन यांनी आपल्या मनोगतातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमात महिला वर्गाची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवून बहिणींना आर्थिक आधार देणारा लाडका भाऊ काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. यामध्ये माजी महिला बालकल्याण सभापती सौ. सायली सावजी, मैफुजा परवीन यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top