Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

  the Bhon Buddhist stupa :भोन बौद्ध स्तूपाचे संशोधक प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा बुलढाण्यात भव्य नागरी सत्कार 

the Bhon Buddhist stupa : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन या गावात सुमारे २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या प्राचीन शहर व भव्य बौद्ध स्तूपाचा उत्खननाद्वारे शोध लावून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक ओळख मिळवून देणारे, पुण्याच्या डेक्कन कॉलेज (डीम्ड युनिव्हर्सिटी) येथील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

the researcher of the Bhon

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन या गावात सुमारे २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या प्राचीन शहर व भव्य बौद्ध स्तूपाचा उत्खननाद्वारे शोध लावून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक ओळख मिळवून देणारे, पुण्याच्या डेक्कन कॉलेज (डीम्ड युनिव्हर्सिटी) येथील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बन बँक मुख्य शाखेसमोर, बुलढाणा येथे संपन्न होणार आहे.

प्रा. डॉ. देवतारे यांनी २००३ ते २००७ या कालावधीत पूर्णा नदीच्या काठावरील प्राचीन भोन गावाचे सखोल उत्खनन केले. या संशोधनातून भोन हे गाव एकेकाळी समृद्ध शहर असून उत्तर व दक्षिण जंबूद्वीपाला जोडणारी महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे स्पष्ट झाले. मौर्यकालात सम्राट अशोकाने या शहराचा विकास करून येथे भव्य बौद्ध स्तूपाची निर्मिती केल्याचे पुरावे समोर आले. या उत्खननामुळे बुलढाणा जिल्ह्याचा ऐतिहासिक व प्राचीन वारसा अधोरेखित झाला आहे.

भोन उत्खननाचा सविस्तर अहवाल बेंगळुरू येथील एका नामांकित संस्थेने प्रकाशित करून सार्वजनिक केला असून, ही बाब बुलढाणा जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद व गौरवाची आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलढाणा जिल्हावासियांच्या वतीने प्रा. डॉ. देवतारे यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार असून, भारतीय पुरातत्त्व विभागाचे जनक मेजर जनरल सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या नावाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात भोन बौद्ध स्तूपावर सखोल चर्चा व्हावी व संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतातील प्रसिद्ध इतिहासकार, विचारवंत व लेखक प्रा. डॉ. विलास खरात यांचे जाहीर व्याख्यान तसेच त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा. रविंद्र इंगळे चावरेकर, नागपूर विद्यापीठाचे पुरातत्त्व विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्याम देवकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दिशा अर्बनच्या अध्यक्षा ॲड. जयश्रीताई शेळके, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष विजय सावळे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, जामा मस्जिद बुलढाण्याचे इमाम हाफिज रहमत खान तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या शाहीना पठाण यांची उपस्थिती लाभणार आहे.

तरी या ऐतिहासिक व वैचारिक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक कुणाल पैठणकर, प्रा. राजेश खंडेराव, ॲड. राहुल दाभाडे, सुरेश डवरे, आत्माराम चौतमोल, भिकाजी मेढे, मोनिका साळवे, प्रशांत बोर्डे, संजय जाधव, सुरेश घेवंदे, सुरेश सरकटे, प्रा. प्रदीप जाधव, सारिका घेवंदे, सिद्धार्थ आराख, गणेश झोटे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top