Mahabreaking

[breaking_news]

Devendrasingh Chavan :राज्यस्तरीय ‘भगवान बिरसा कला संगम २.०’मध्ये अकोल्याची मोहोर; देवेंद्रसिंह चव्हाण यांना पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये चौथा क्रमांक

Devendrasingh Chavan : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या सांस्कृतिक महोत्सवात अकोला जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आदिवासी टाकणकार समाजाचे नेतृत्व करणारे देवेंद्रसिंह शालीग्राम चव्हाण यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘देव, दैवते आणि आदिवासी श्रद्धा व परंपरा’ या विषयावरील पोस्टर प्रेझेंटेशन (डिजिटल पोस्टर सादरीकरण) या कलाप्रकारात त्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत संपूर्ण महाराष्ट्रातून चौथा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे अकोला जिल्ह्यासह आदिवासी टाकणकार समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Devendrasingh Chavan

आदिवासी टाकणकार समाजाचा नावलौकिक राज्यभरात; गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या सांस्कृतिक महोत्सवात अकोला जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आदिवासी टाकणकार समाजाचे नेतृत्व करणारे देवेंद्रसिंह शालीग्राम चव्हाण यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘देव, दैवते आणि आदिवासी श्रद्धा व परंपरा’ या विषयावरील पोस्टर प्रेझेंटेशन (डिजिटल पोस्टर सादरीकरण) या कलाप्रकारात त्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत संपूर्ण महाराष्ट्रातून चौथा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे अकोला जिल्ह्यासह आदिवासी टाकणकार समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त, म्हणजेच जनजातीय गौरव दिनानिमित्त, १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात हा भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुख्य समारोप सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पद्मश्री चेत्राम पवार, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (टीआरटीआय) आयुक्त निलेश सागर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात आदिवासी कला, पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि हस्तकलेचे विलोभनीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. याच मंचावरून आदिवासी विकास विभागाच्या २२ आश्रमशाळा आणि ५१ वसतिगृहांचे लोकार्पणही करण्यात आले. अशा भव्य आणि प्रतिष्ठित महोत्सवात राज्यभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांसमोर देवेंद्रसिंह चव्हाण यांनी आपल्या डिजिटल पोस्टर सादरीकरणातून प्रभावी कलाविष्कार सादर केला आणि परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली.

संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चौथा क्रमांक मिळविणे ही अकोला जिल्ह्यासाठी, तसेच विशेषतः आदिवासी टाकणकार समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. या यशाबद्दल भावना व्यक्त करताना देवेंद्रसिंह चव्हाण म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या समाजाचा व हितचिंतकांचा आहे.”

देवेंद्रसिंह चव्हाण हे चोहोट्टा बाजार येथील सार्वजनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपल्या समाजाच्या संस्कृतीबद्दल विशेष अभिमान असून, आदिवासी टाकणकार समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी ‘जागर संस्कृतीचा’ यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या राज्यस्तरीय यशाबद्दल आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top