Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

After a cinematic chase :सिनेस्टाइल पाठलागानंतर टिप्पर चालकांनी रेती रस्त्यावर टाकून काढला पळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

After a cinematic chase : अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई तीव्र केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. जप्त केलेले टिप्पर पोलीस स्टेशनला न लावता चालकांनी रेती रस्त्यावर सांडून पळ काढला. त्यामुळे, दोन्ही टिप्पर चालकांविरुध्द देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

After a cinematic chase

महसूल आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाची कारवाई: दोन टिप्परमध्ये होती चार ब्रास रेती

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई तीव्र केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. जप्त केलेले टिप्पर पोलीस स्टेशनला न लावता चालकांनी रेती रस्त्यावर टाकून पळ काढला. त्यामुळे, दोन्ही टिप्पर चालकांविरुध्द देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कविता माणिकराव सिरसाट (वय ४७, व्यवसाय – महसूल सेवक, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून लक्ष्मण पवार व गणेश नागरे (रा. सिनगाव जहागीर, ता. देऊळगाव राजा) यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान, सिनगाव जहागीर फाटा ते देळे गव्हाण दरम्यान तहसीलदार यांच्या पथकासोबत अवैध रेती वाहतुकीविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा टिप्पर संशयास्पदरीत्या येताना आढळून आला. तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरीत्या चोरून नेण्यात येणारी सुमारे चार ब्रास रेती (अंदाजे किंमत २० हजार रुपये) असल्याचे निदर्शनास आले.
सदर टिप्पर पोलीस ठाण्यात आणण्याचे आदेश दिल्यानंतर, टिप्पर चालकांनी राजूर रोडच्या दिशेने अतिवेगाने व बेजबाबदारपणे वाहन चालवत, टिप्परमधील रेती रस्त्यावर सांडून पळ काढला. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पोहेकॉ. भास्कर सानप (ब.नं. १८३६) यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाची कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top