Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Akot devotional : भव्य महानाट्याने अकोट भक्तीमय; जीवनगौरव व अकोट भूषण पुरस्कारांचे वितरण

Akot devotional : श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित ‘गणू गण गण गणात बोते’ हे भव्य महानाट्य अकोट येथे भक्तीमय वातावरणात पार पडले. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, ॲड. संतोष खवले यांच्या पुढाकारातून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश विनामूल्य असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.लोकमतच्या माध्यमातून सकारात्मक व समाजोपयोगी पत्रकारितेची दखल घेत लोकमतचे अकोट तालुका प्रतिनिधी विजय शिंदे यांना अकोट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शहरवासीयांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

Akot devotional

लोकमतचे विजय शिंदे अकोट भूषण पुरस्काराने सन्मानीत

अकोट : श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित ‘गणू गण गण गणात बोते’ हे भव्य महानाट्य अकोट येथे भक्तीमय वातावरणात पार पडले. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, ॲड. संतोष खवले यांच्या पुढाकारातून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश विनामूल्य असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.लोकमतच्या माध्यमातून सकारात्मक व समाजोपयोगी पत्रकारितेची दखल घेत लोकमतचे अकोट तालुका प्रतिनिधी विजय शिंदे यांना अकोट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शहरवासीयांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

श्री संत गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित २१ अध्यायांचे सादरीकरण सुमारे २०० कलावंतांनी प्रत्यक्ष रंगमंचावर साकारले. महाराजांच्या विविध लीलांचे दर्शन घेताना हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री संत गजानन महाराजांची सामूहिक महाआरती करण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला.

या कार्यक्रमास नवनीत लाखोटिया, सौ. मायाताई म्हैसने, ठाणेदार अमोल माळवे, ठाणेदार किशोर जुनघरे, श्री गोपाल मोहोड, श्री राहुल कराळे, माजी नगराध्यक्षा मनीषा मते, श्री दीपक गोरे, श्री आनंद देशमुख, सौ. अमृता खवले, श्री संतोष जगताप, सौ. स्नेहा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना काळात अकोट शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल ठाणेदार संतोष महल्ले, ठाणेदार ज्ञानोबा फड व तहसीलदार राजेश गुरव यांना शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच अकोट शहरात विविध क्षेत्रांत दीर्घकाळ तन-मन-धनाने सेवा देणारे ह.भ.प. सत्यपाल महाराज, श्री राजेश नागमते, डॉ. अमोल राजगुरू, श्री नवीन चांडक, ॲड. संदीप वालशिंगे, ॲड. सुशील खवले, श्री जगन्नाथजी धर्मे, लोकमतचे अकोट तालुका प्रतिनिधी विजय शिंदे, पत्रकार संजय आठवले, रामदास काळे, हिम्मत दंडी, राजीव खारोडे, कैलास वर्मा, विशाल कुलट यांना अकोट भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रील स्टार अभिनेता विजय खंडारे, अभिनेत्री तृप्ती खंडारे, आदिराज घनघाव, युवराज घनघाव जालनाकर, अभिनेता श्रीवेश देशमुख, अभिनेत्री स्टेफी प्यारेजी यांना महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत मोठ्या बहुमताने निवडून आलेले दिलीप बोचे, सौ. विजया बोचे, सुशील पुंडकर, सौ. सुनीता महल्ले, संतोष झुंझुनवाला यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष वैभव जगताप, प्रमोद सोनोने, कोषाध्यक्ष निखिल वानखडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. आयोजक ॲड. संतोष गजानन खवले व कार्याध्यक्ष वैभव जगताप यांनी सर्व सहकाऱ्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.

 

Akot devotional

धन्यवाद ! शहरात मिळालेला सन्मान..अकोट भुषण पुरस्कार
हा भविष्यातही सकारात्मक उर्जा व प्रखर लेखनीतुन न्याय मिळवून देण्यासाठी बळ देणारा ठरो.अकोला जिल्ह्यातील आकोट सारख्या शहरात पत्रकारिता करताना अनेक शासनाचे पुरस्कार मिळाले. शोध पत्रकारीता दखल घेत राज्य व राष्ट्रीयस्तरावरीय पुरस्कार मिळाले. शासन,अनेक संस्थांनी, संघटनानी दिलेल्या विविध पुरस्कारात घरातील शोकेस भरले. पंरतु ज्या शहरात आपण गेली अनेक वर्षापासुन अतुलनीय पत्रकारीता केली.त्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत स्थानिक युवकांची संघटना छत्रपती शिवबा सेवाभावी शिक्षणसंस्था व युवा प्रतिष्ठानच्या वतीने हजारो शहरवासीयांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ गजानन महाराज या गणु व्यासपीठावर अकोट भुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले, स्वतःच्या शहरात मिळालेली शाबासकीचा आशिर्वाद हा क्षण माझ्या आयुष्यात,भविष्यात प्रेरणादायी ठरला आहे, धन्यवाद!
-विजय मनोहर शिंदे,लोकमत अकोट(अकोला),

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top