Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Administration Ready :काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; गॅस-पेट्रोल पंपांवर तपासणी मोहीम

Administration Ready :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुलढाणा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरवठा विभागाने दिला आहे.

Administration Ready

निलीमा उरकुडे ‘एक्शन मोड’मध्ये; घरगुती गॅसचा गैरवापर आढळल्यास कडक कारवाई

पंडीत सावळे

मासरुळ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुलढाणा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरवठा विभागाने दिला आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३) तसेच Maintenance of Production, Storage and Supply Order अंतर्गत ९ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.

हॉटेल, ढाबे व मंगल कार्यालयांना सूचना

बुलढाणा शहर व तालुक्यातील गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल-उपहारगृह, ढाबा मालक तसेच मंगल कार्यालय चालक यांनी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान अशा प्रकारचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

दक्षता पथकांची स्थापना

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. बुलढाणा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील या पथकांकडून गॅस एजन्सी, पेट्रोल पंप तसेच व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता किंवा साठेबाजी आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

 

अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, पेट्रोल, डिझेल व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घबराट पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.निरीक्षण अधिकारी निलीमा उरकुडे यांनी सांगितले की, शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top