Mahabreaking

[breaking_news]

Accused Sentenced to 3 Years :अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस ३ वर्षांची शिक्षा; अकोला न्यायालयाचा निर्णय

Accused Sentenced to 3 Years : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, छेडछाड व धमकी देणाऱ्या आरोपी युवकाला दोषी ठरवत अकोला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ यांनी तीन वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा आज दि. १६ मे २०२६ रोजी सुनावली आहे.  सोनू उर्फ आदित्य उत्तम शितळे (वय १८, रा. जेतवन नगर, धोबी खदान, अकोला) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

Accused Sentenced to 3 Years

 छेडछाड, मारहाण व धमकी प्रकरणी आरोपीला न्यायालयाकडून शिक्षा

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, छेडछाड व धमकी देणाऱ्या आरोपी युवकाला दोषी ठरवत अकोला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ यांनी तीन वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा आज दि. १६ मे २०२६ रोजी सुनावली आहे.  सोनू उर्फ आदित्य उत्तम शितळे (वय १८, रा. जेतवन नगर, धोबी खदान, अकोला) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदा व भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार शिक्षा सुनावली. त्यानुसार, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत ३ वर्षांचा साधा कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास ठोठावण्यात आला. तसेच कलम १२ अंतर्गत २ वर्षांचा साधा कारावास व ५ हजार रुपये दंड, तर भादवी कलम ३५४ अंतर्गत ३ वर्षांचा साधा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कलम ३५४(ड) अंतर्गत १ वर्षांचा साधा कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत ६ महिन्यांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ अंतर्गत ३ महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेतून घरी परतत असताना आरोपी सोनू उर्फ आदित्य शितळे याने तिची छेड काढून अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर पखाले कारखान्याजवळील सुनसान ठिकाणी तिचा हात पकडून ओढाताण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आत्यासह नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला जाब विचारला असता आरोपी व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२२ अन्वये भादवी कलम ३५४, ३५४(ड), ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ७, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र धुळे यांनी उत्तमरित्या करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पीडिता व इतर साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले व शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता  क्षितीज अनोकार यांनी काम पाहिले. तसेच खदान पोलीस ठाण्यातील पोहेकॉ शाम पिंपळे व सीएमएस येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया शेगोकार यांनी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा केला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील तसेच खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top