Mahabreaking

[breaking_news]

Access government services :एकाच महाआयडीवर मिळणार शासकीय सेवांचा लाभ; नागरिकांनी महासारथीवर नोंदणी करावी

Access government services : राज्य शासनाच्या विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभ, जलद व एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महासारथी’ हे एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र महाआयडी (MahaID) क्रमांक प्रदान करण्यात येणार आहे.

Access government services

शासकीय योजनांसाठी ‘महाआयडी’ महत्त्वाची; महासारथी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 बुलढाणा : राज्य शासनाच्या विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभ, जलद व एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महासारथी’ हे एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र महाआयडी (MahaID) क्रमांक प्रदान करण्यात येणार आहे.

भविष्यात राज्य शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी हा एकच महाआयडी क्रमांक उपयोगात आणता येणार आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सेवा आणि सुविधांची माहितीही या पोर्टलवर एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.

महाआयडी तयार करण्यासाठी नागरिकांनी महासारथी पोर्टलला भेट देऊन आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती भरून महाआयडी क्रमांक तयार करावा. लॉगिन केल्यानंतर माहितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास ती अद्ययावत करावी. पुढे पात्रतेनुसार उपलब्ध शासकीय योजना व सेवांची माहिती पोर्टलवरून मिळू शकते.

महासारथी पोर्टलवर नोंदणीसाठी नागरिकांनी महासारथी पोर्टल ला भेट द्यावी. तसेच नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक व्हिडिओ चा उपयोग करावा.

जास्तीत जास्त नागरिकांनी महासारथी पोर्टलवर नोंदणी करून आपला महाआयडी तयार करावा आणि शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top